Tula pahile me....

Sunday, February 01, 2009

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही 
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही 

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना 
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना 
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा 
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही 

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे 
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने 
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही 
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही 

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी 
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी 
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो 
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही 

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो 
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो 
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही 
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

लव्हलेटर.......

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं 

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं


वेड लागलं


दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा 
आता रण रण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं

हरकत नाही...

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

-----------------------------------------------संदीप

हे गंधित वारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

-संदिप खरे

Friday, January 30, 2009

मी

असेनही जरी मी सर्वांनी सोडलेला...!!!
असेनही जरी मी साम्प्रत्काली मोड्लेला...!!!
परुंतु इतुके निश्चित मजला ठाव की 
मी इथला - पण नक्षत्रांशी जोडलेला...!!!!


हे गंधित वारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .


हिरे-मोती

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥


हृदय

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही


तुला मी पाहिले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले, 
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले 

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा, 
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले 

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला, 
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले 

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे, 
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ? 

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा 
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले 
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली, 
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले 

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले, 

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले 


Friday, February 01, 2008

तू...

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे, अशी गोड तू...निशेने नव्या मंद गंधात न्हावे,
अशी गोड तू...
जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,मनाचे समाधान आकंठ व्हावे,
अशी गोड तू...
तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,तुला पाहता त्या मुलाने हसावे,
अशी गोड तू...
सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,हरीने तसे धुंद होऊन जावे,
अशी गोड तू...
कशाला अशी आर्तशी भैरवी आळवू मी पुन्हानवे सूर आता मनाचे जुळावे,

अशी गोड तू...


Pula..





क्षण


क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून, मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून .. आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..दूर जाताच आठवती क्षण सारे सोबतीचे ,क्षण बालपणीच्या हट्टाचे, कॉलेजमधील मौजमजेचे..समाधानाचे क्षण आणि काही कठीण प्रसंगाचे.सरकतात डोळ्यापुढे जेव्हा भरून येतात डोळे,वाटते फिरून यावेत आयुष्यात पुन्हा ते क्षण सारे !

Udas KA..??





Tahan





Wednesday, January 30, 2008

Vande MAtaram.





सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या



सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की

अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला

कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे

तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे

तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा

अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची

कशास केलीस आजर्वे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला

तुझ्याच जे अंतरात आहे

Janma Mrityu








aaaaaaaaaas.....










aaaaaaaaaas.....





Saturday, December 29, 2007





Sunday, November 18, 2007

आयुष्य खूप सुंदर आहे



आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहेजगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहेवाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहेजपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहेसोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहेकुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहेपचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहेउमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते

हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे

विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे

विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते

सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं

त्या भाग्यवंतांचं ठीक आहे उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे

Thursday, March 15, 2007

Mhanalo nahi...*****